सावंतवाडीत दहावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, शहरात खळबळ
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील जुनाबाजार_कामतनगर येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.जतिन प्रशांत राऊळ (१६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून अधिक तपास करीत आहेत. जतिन राऊळ हा उत्कृष्ट कबड्डीपटु होता. यंदा तो राज्यस्तरावर खेळला होता. त्याची राष्ट्रीय स्तरावर देखील निवड झाली होती. आज शाळेत इतिहासाचा पेपर होता. परंतु जतिन टेक्निकलचा विद्यार्थी असल्याने शाळेत गेला नव्हता.
