You are currently viewing वेंगुर्ले येथे रामेश्वर मंदिरात १९ जानेवारी पासून माघी गणेश जयंती उत्सव…

वेंगुर्ले येथे रामेश्वर मंदिरात १९ जानेवारी पासून माघी गणेश जयंती उत्सव…

वेंगुर्ले येथे रामेश्वर मंदिरात १९ जानेवारी पासून माघी गणेश जयंती उत्सव…

वेंगुर्ले

येथील रामेश्वर मंदिरात १९ ते २४ जानेवारीपर्यंत माघी गणेश जयंती उत्सव व परिवार देवतांचे वर्धापनदिन उत्सव साजरे होणार आहेत. १९ ला उत्सवास प्रारंभ, श्री रामेश्वरावर लघुरूद्र व अभिषेक, २० ला शनिदेव वर्धापनदिन, श्री सत्यनारायणाची महापूजा, २१ ला श्री नागेश्वर वर्धापनदिन, वरदशंकर व्रतपूजा, नवचंडी देवता स्थापना व पाठवाचन, २२ ला श्री गणेश जयंती, २१ गणपतींची स्थापना व २१ गणेशयाग (हवन) पूर्णाहूतीसह, सायं. ४ पासून हळदीकुंकू, २३ ला श्री भगवती वर्धापनदिन, नवचंडी हवनयुक्त, स.१० पासून कुंकूमार्चन, नवचंडी हवनाची पूर्णाहूती, सायं.५ वा.गणपती विसर्जन, २४ ला १२ वा.बारापाच देवतांस महानैवेद्य, आरती, गा−हाणे व सर्व लोकांस महाप्रसाद. उत्सव कालावधीत रात्रौ.७ वा. तरंगदेवता व गणपती-भगवती, नागनाथ-दत्त यांची भजनासहीत पालखी प्रदक्षिणा. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा