You are currently viewing देवगडात पहिल्याच दिवशी ९ इच्छुकांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
Oplus_16908288

देवगडात पहिल्याच दिवशी ९ इच्छुकांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

देवगड :

देवगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आज शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली. पहिल्याच दिवशी गट व गण मिळून एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी एकूण ६ उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यात उबाठा – ४ अर्ज, इतर पक्ष – १ अर्ज आणि अपक्ष – १ अर्ज असे अर्ज दाखल झाले आहेत.

तर पंचायत समिती गणासाठी एकूण ३ उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले असून त्यामध्ये उबाठा – १ अर्ज, भाजप – १ अर्ज आणि अपक्ष – १ अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होताच देवगड तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या काही दिवसांत आणखी उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापत चालले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा