*ॲड.अनिल निरवडेकर उपनगराध्यक्षपदी विराजमान..!*
*” सावली फाउंडेशन ” व मल्ल प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मान..*
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ॲड. अनिल निरवडेकर यांची निवड झाल्याबद्दल शहरात आनंदाचे वातावरण आहे. या आनंदोत्सवा प्रसंगी ” सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग ” व मल्ल प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मानप्रसंगी ” सावली फाउंडेशन “च्या संस्थापक अध्यक्षा सावली पाटकर, मल्ल प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह सुनील नेवगी, निरंजन मिसाळ, सचिन पाटकर, प्रशांत चव्हाण, ललित हरमलकर, फीजा मकानदार, नितीन दळवी, राजेश परब आदी संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ॲड.अनिल निरवडेकर यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या कार्यासाठी अभिनंदन करण्यात आले.
नेतृत्वाला सलाम… सेवाभावी वाटचालीस शुभेच्छा..!
