महायुतीच्या यशाचा प्रहार भवनसमोर फटाके, घोषणाबाजी आणि उत्साहात आनंदोत्सव
खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
कणकवली :
मुंबई महानगरपालिकेत मिळालेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या वतीने कणकवली येथे भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. कणकवलीतील प्रहार भवनसमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी आणि जल्लोषात हा आनंदोत्सव साजरा केला.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महायुतीने सत्ता प्रस्थापित केल्याचा आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांनी “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढो”, “खासदार नारायण राणे आगे बढो”, “मंत्री नितेश राणे आगे बढो”, “आमदार निलेश राणे आगे बढो”, “प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आगे बढो” अशा घोषणा दिल्या. यावेळी महायुतीचा जयजयकार करत परिसर उत्साहाने दुमदुमून गेला.
या जल्लोषाला नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
