You are currently viewing गुलाबस्तवन…!!

गुलाबस्तवन…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन…!!*

पद्मभूषण गाडगीळसरांना समर्पित..!!

 

अस्मितेच्या बिलोरी आरश्यावर

डोळे दिपेपर्यंत चमकलास

वक्षावरं रंगलावण्य उसळलं

मस्तवाल सिंहासनावर बसलास..!

 

ईश्वरीरूपात आगमन तुझे

उत्सव अंगणात साजरा केलास

एकेका पाकळीतलं जीवन गीत

तू भारावल्यापोटी गात गेलास..!

 

अवकाशात आत्मस्वरूप पसरून

भावपंचमाचा सूर तू लावलास

पाकळ्यांत शृंगाराचा बाज तुझा

स्पर्शानं आनंदविभोर होऊन नाचलास

 

मोहिनी चिरंतन तुझी

भुलवणं प्रगाढ करतोस

साज सौंदर्याचा लेवून

बहुरूपांनी धरेला नटवतोस..!

 

आकाश हसलं सुखानं

स्नेहपाशात जखडून घेतलसं

निराकारात निश्चयाचं संचित

मैत्रिकीसं प्राणांपाड जपलसं..!!

 

बाबा ठाकूर कवीमाळी

भारतीय पाच भाषेत अनुवादित

सादरीकरणाची 2525+

प्रतिक्रिया व्यक्त करा