You are currently viewing निवडणुकीचे वारे व नागरिकांचे कर्तव्य….

निवडणुकीचे वारे व नागरिकांचे कर्तव्य….

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निवडणुकीचे वारे व नागरिकांचे कर्तव्य…*

 

 

निवडणुकीचे वारे वाहू लागले की

चेतनांचे दार उघडते जागते,

शब्दांआड आशा बोलू लागली,

मतदानातूनच भविष्य घडते

 

घोषणांच्या गर्दीत भुल न पडता

विवेकाची मशाल पेटती ठेवावी

क्षणिक लाभांपेक्षा मूल्य मोठे

जबाबदारीतूनच लोकशाही फुलवावी

 

नागरिक केवळ मतदार नव्हे

व्यवस्थेचा भक्कम आधार व्हावा

प्रश्न विचारणे हेही कर्तव्य

संविधानाशी निष्ठावंत रहावा

 

भेदांच्या रेषा मिटवत जावे

एकतेचे हात दृढ धरावे

मतदानातून बोलते माणुसकी

समतेचे संदेश ठाम द्यावे

 

निष्पक्ष निर्णय, शांत विवेक

हेच मतदानाचे खरे बळ असते

आवेश नव्हे, तर सुजाणपणे

लोकशक्तीचे उगम मूळ धरते

 

निवडणूक म्हणजे जनोत्सव

जाणीवांची नवी पहाट उजाडते

नागरिकांनी पवित्र कर्तव्याने

मत दिले तर देशाची वाट उजळते

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा