*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी दुर्गाप्रसाद खांडाळेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महापालिकेच्या निवडणुकी निमित्ताने….*
महापालिकेच्या प्रशासकीय
कालखंडाचा अंत व्हायचा
दिवस उजाडला
म्हणजे नगरसेवकांच्या
निवडणूकीचा दिवस उजाडला
निमित्ताने जनतेला
विचित्र पक्ष युत्या,
उमेदवारांच्या कोलांट्याउड्या
खोट्या आश्वासनांचा
खेळ मोफत पाहायला मिळाला
स्वार्थासाठी या राजकीय पक्षानी
धरले आहे गृहीत मतदाराला
एक दिवसाचा राजा केले त्याला
पण मतदार बघतो आहे
उघड्या डोळ्यानी व थंड डोक्याने
त्यांची ही कारस्थाने
त्यामुळे आशा करुया
मतदार दाखवेल उमेदवाराला
त्याची जागा लायकी प्रमाणे
दुर्गाप्रसाद खांडाळेकर
बोरिवली
