*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मकर संक्रांत*
सूर्यदेवाचे मकर संक्रमण
उत्तरायणाची सुखद नांदी
तमातून प्रकाशाकडे वाटचाल
चैतन्य.. सृजन..चराचर आनंदी.
सण मकर संक्रांतीचा
या अयनातील प्रथम सणोत्सव
तिळाच्या स्नेहाचा अन्
गुळाच्या गोडव्याचा,उत्सव.
तीळगुळ घ्या ,गोड बोला
संदेश देतो,सामंजस्याचा
कटुता..रुसवा.सोडून देऊनी
गोडवा टिकवा हो नात्यागोत्यांचा.
ललनांचे हळदीकुंकु ख्यात
नटणे..सजणे..दिन शृंगाराचे
बोरे..पेरू.. मटार.तीळलाडू
वाण ..दान.. देती शुभ पर्वाचे.
पतंग उत्सव,खास वैशिष्ट्य
सान थोर घेती आनंद
कर्तृत्वाची घ्यावी गगन भरारी
यश..कीर्तीचा मिळवावा स्वानंद.
सुंदर संदेश असा या सणाचा
तीळ..तीळ.. वाटून खावा सर्वांनी
समरसता…समाजभान .वाढावे
हीच प्रार्थना प्रभुचरणी!
सौ. मंजिरी अनसिंगकर नागपूर.
