You are currently viewing तिळगुळ घ्या गोड बोला

तिळगुळ घ्या गोड बोला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तिळगुळ घ्या गोड बोला*

 

सूर्याचे मकर राशीत।

होतसे पहा संक्रमण ।।

संक्रात सण आनंदाचा।

सुरू झाले उत्तरायण।।। १

 

आहे जानेवारी महिना।

सण तिळगुळ देण्याचा।।

कृष्ण पक्ष हा पौषातील।

गोड बोला हो म्हणण्याचा।। २

 

नटती साऱ्या सुहासिनी।

देती वाण एकमेकींना ।।

तिळगुळ घ्या, गोड बोला।

म्हणती हर्षे मैत्रिणींना ।।। ३

 

 

सारी मुले खेळ खेळती।

पतंग उडविती उंच ।।

रंगबिरंगी पतंगाचा ।

खेळ चालतो आकाशात।। ४।।

 

तिळगुळ घ्या गोड बोला।

मंत्र आपण आचरावा।।

स्वतः आनंदात राहून।

दुसऱ्यास आनंद द्यावा।। ५

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा