You are currently viewing खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत १६ जानेवारीला महायुतीची संयुक्त बैठक

खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत १६ जानेवारीला महायुतीची संयुक्त बैठक

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत महत्त्वाची बैठक

सिंधुदुर्ग :

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली येथील प्रहार भवनातील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी व शिवसेना पदाधिकाऱ्यांची महायुतीची संयुक्त बैठक दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याच दिवशी सकाळी ११ वाजता भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार असून, दुपारी २ वाजता महायुतीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा