देवगडमध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्सवाला २५ जानेवारीपासून सुरुवात
देवगड
तांबळडेग येथील मच्छीमार बांधव आणि शहरातील सामान्य माणूस गेली कित्येक वर्षे सात दिवस बाह्यनदात घालवायचे या विचारातून प्रतिवर्षी श्री देव विठ्ठल रखुमाई सप्ताह सोहळ्यात सहभागी होत असतात. हाच सोहळा दि. २५ जानेवारी ते दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.तर दि. २९ जानेवारी रोजी एकादशी असून यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहाचे पूजेचे मानकरी म्हणून श्री. किशोर लक्ष्मण चोपडेकर सौ. निलिमा किशोर चोपडेकर या दांपत्याला बहुमान देण्यात आला आहे. दि. १ फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दहिकालाने होईल. त्याचं रात्रौ ठिक १० वाजता प्रहर क्र.५ यांच्या सौजन्याने ” राधाकृष्ण कलामच मुंबई निर्मित”दोन अंकी मालवणी नाटक ” वाट चुकलो देव ” सादर करण्यात येणार आहे. सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद (समाराधना) यांने सायंकाळी उत्सव सांगता होईल. तरी या मंगल समयी धार्मिक कार्यास भाविक भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळीसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अध्यक्ष महादेव नामदेव कोचरेकर आणि चिटणीस काका मुणगेकर यांनी संयुक्तरीत्या आवाहन केले आहे.
