You are currently viewing एमआयटी एसओसी, मॉडर्न लॉ कॉलेजची विजयी सलामी

एमआयटी एसओसी, मॉडर्न लॉ कॉलेजची विजयी सलामी

*एमआयटी एसओसी, मॉडर्न लॉ कॉलेजची विजयी सलामी*

*एमआयटी-एडीटी विद्यापीठात स्पर्धेच्या क्रिकेट सामन्यांची रोमांचक सुरुवात*

*लोणी काळभोर :*

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांची सोमवारी दिमाखात सुरुवात झाली. एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात व निकम क्रिकेट अकादमीच्या मैदानावर एकाच वेळी दोन रोमांचक सामने खेळले गेले. यामध्ये यजमान संघ एमआयटी एडीटी एसओसी, लोणी-काळभोर संघाने आळंदीच्या एमआयटी एसीएससी संघाचा ३१ धावांनी, तर मॉडर्न लॉ कॉलेज संघाने एमआयटी एसओईवर १० गडी राखून विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एमआयटी एसओसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस पारवेचा प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय संघाचा स्फोटक फलंदाज सुमित हिंगे याने सार्थ ठरवला. सुमितने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार व २ षटकारांसह ७४ धावांची स्फोटक खेळी करत संघाची धावसंख्या दीडशे पार करून दिली. सुमितच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एमआयटी एसओसी संघाने निर्धारित १६ षटकांत ४ गडी गमावून १६१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात एमआयटी एसओसीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर एमआयटी एसीएससी संघाला गती मिळवण्यात संघर्ष करावा लागला. हर्ष पांडेच्या ४६ धावांच्या (२८ चेंडू) झुंजार खेळीनंतरही संघाला ७ गडी गमावून केवळ १३० धावा करता आल्या. एमआयटी एसओसीसाठी गोलंदाजीत पूर्वविजय सोनी चमकला. त्याने आपल्या निर्णायक गोलंदाजीने केवळ १८ धावांत ४ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाचा पाठलाग पूर्णपणे मोडून काढला.

निकम क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेला दिवसाचा दुसरा सामना एकतर्फी ठरला. यात मॉडर्न लॉ कॉलेजने एमआयटी एओईवर आपले वर्चस्व दाखवले. प्रथम फलंदाजी करताना एमआयटी एओई संघ सुरुवातीलाच अडचणीत सापडला आणि १४ षटकांत केवळ ९७ धावांवर सर्वबाद झाला. मॉडर्न लॉ कॉलेजसाठी संग्राम शेवाळेने २६ धावांत ३ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली, तर एमआयटी एओईकडून श्रेयसने (३४ धावा) एकमेव प्रतिकार केला.

प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग अत्यंत प्रभावी व वेगवान ठरला. मॉडर्न लॉ कॉलेजच्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी हे लक्ष्य सहज गाठले आणि अवघ्या ८ षटकांत एकही गडी न गमावता विजय मिळवला. वेदांत भडमुखेने २७ चेंडूंमध्ये ५३ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर त्याला आर्यन जाधवने (२१ चेंडूंमध्ये ४२ धावा) उत्तम साथ दिली. एमआयटी एओईच्या एकाही गोलंदाजाला सामन्यात प्रभाव पाडता आला नाही.

*संक्षिप्त धावफलक :*
*एमआयटी एसओसी : १६ षटकांत ४ बाद १६१* (सुमित हिंगे ७४ धावा – ४२ चेंडू, रोहित शर्मा नाबाद १७; प्रसाद तापकीर २-३२, यश खरात १-४७) *वि.वि. एमआयटी एसीएससी : १६ षटकांत ७ बाद १३०* (हर्ष पांडे ४६ धावा – २८ चेंडू, अथर्व शितोळे २३ धावा; पूर्वविजय सोनी ४-१८, सुजल पडवळ २-३४, यश कुमार १-१९); *सामनावीर : सुमित हिंगे.*
—–
*एमआयटी एओई : १४ षटकांत सर्वबाद ९७* (श्रेयस ३४ – २० चेंडू, प्रथमेश तिरपुडे २१; संग्राम शेवाळे ३-२६, ओम जागे २-४, यश बोरकर २-१५, आर्यन जाधव १-२५) *पराभूत वि. मॉडर्न लॉ कॉलेज ८ षटकांत बिनबाद ९८ :* (वेदांत भडमुखे नाबाद ५३ धावा – २७ चेंडू, आर्यन जाधव नाबाद ४२ धावा – २१ चेंडू); *सामनावीर : आर्यन जाधव.*
——————————
*संवाद मीडिया*

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

*🚆🚇”टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण” ‘भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेन द्वारे (मनमाड पासून)🚇🚆*

*✔️ प्रस्थानाची तारीख: 18.02.2026*
*✔️ कालावधी: 12 रात्री / 13 दिवस*
https://sanwadmedia.com/192294/

*🔶️18.02.2026 – मनमाड / नाशिकरोड / कल्याण / लोणावळा / पुणे / सातारा / मिरज* येथून प्रस्थान.

*🔷️19.02.2026 – ट्रेन प्रवास.*

*🔶️20.02.2026 – मुरुडेश्वर*
सकाळी मुरुडेश्वर स्टेशनवर आगमन, फ्रेश झाल्यावर मुरुडेश्वर शिव मंदिर आणि मुरुडेश्वर बीच ला भेट देण्यासाठी प्रस्थान. रात्री उशिरा गुरुवायूरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेन प्रवास)

*🔷️21.02.2026 – गुरुवायूर*
सकाळी गुरुवायूर येथे आगमन, फ्रेश झाल्यावर गुरुवायूर मंदिराला भेट देण्यासाठी प्रस्थान. रात्री उशिरा रामेश्वरमकडे प्रस्थान (रात्रभर ट्रेन प्रवास).

*🔶️22.02.2026 – रामेश्वरम*
रामेश्वरमला आगमन, (वाटेत पांबन पुलाचे मनमोहक दृश्य अनुभवा) रामनाथस्वामी मंदिर आणि धनुष्कोडीला भेट द्या (रात्री टार्मेश्वरम येथे मुक्काम),

*🔷️23.02.2026 – रामेश्वरमदुराई*
दुसऱ्या दिवशी दुपारी ट्रेनने मदुराईला प्रस्थान, मदुराईला आगमन नौनाक्षी मंदिराला भेट रात्री उशिरा कन्याकुमारीकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेन प्रवास).

*🔶️24.02.2026 – 25.02.2026 – कन्याकुमारी*
पहाटे कन्याकुमारी येथे आगमन, हॉटेल चेक इन, फ्रेश झाल्यावर सचिंद्रम श्री थानुमालयन स्वामी मंदिर, कन्याकुमारी मंदिर, विवेकानंद रॉक मैमोरियल, गांधी मंडपम आणि सूयाँटत पॉईंट भेट द्या. (कन्याकुमारी येथे रात्रीचा मुक्काम).

दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर, हॉटेल चेक आऊट करून त्रिवेंद्रम ला जाण्यासाठी कन्याकुमारी स्टेशन कडे प्रस्थान, त्रिवेंद्रम येथे आगमन आणि पद्मनाभस्वामी मंदिर आणि कोवलम बीचला भेट द्या. दात्री उशिरा त्रिवेंद्रमहून तिरुचिरापल्ली जंक्शन कडे प्रस्थान (रात्रभर ट्रेन प्रवास).

*🔷️26.02.2026 – तिरुचिरापल्ली*
तिरुचिरापल्ली जंक्शन रेल्वे स्टेशनवर आगमन, फ्रेश झाल्यावर श्री रंगनाथस्वामी मंदिर आणि तंजावर मंदिटाला भेट तंजावरहून चेंगलपट्टूकडे प्रस्थान (रात्रभर ट्रेन प्रवास)

*🔶️27.02.2026 – चेंगलपट्ट -कचीपुरम*
चेंगलपट्टू रेल्वे स्टेशनवर आगमन, फ्रेश झाल्यावर कामाक्षी अम्मान मंदिर, आणि एकंबटेश्वर मंदिर आणि श्री वरधराजर पेरुमल मंदिराला भेट. (कांचीपुरम येथे रात्री मुक्काम).

*🔷️28.02.2026 – कांचीपुरम – महाबलीपुरम*
(रात्रभर ट्रेन प्रवास) दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर हॉटेल चेक आऊट करून महाबलीपुरमला च्या शोर मंदिर आणि कृष्ण बटटबॉलला भेट. संध्याकाळी उशिरा चेंगलपटूहून परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान.

*🔶️01.03.2026 – ट्रेन प्रवास*

*🔷️02.03.2026 – मनमाड / नाशिकरोड / कल्याण / लोणावळा / पुणे / सातारा / मिरज मधल्या स्टेशनवर उतरणे. गोड़ आठवणी सोबत यात्रा समाप्त!*

*🛑टूरचा खर्च (प्रति व्यक्ती)*
*स्लीपर (इकॉनॉमी): रु. २३,३७०/-*
*स्टॅंडर्ड (३एसी): रु. ३६,९९०/-*
*कम्फर्ट (२एसी): रु. ४८,७६०/-*

*🛑 समाविष्टित सेवा व् सुविधा*-
1. बस,रेल्वे प्रवास कन्फर्म रिज़र्वेशन सह ,
2. राहण्याची निवास ची व्यवस्था
3. शुद्ध शाकाहारी दोन वेळा जेवण 1 नाश्ता, चहा
4. पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी बस ची व्यवस्था
5. प्रवास विम्याची व्यवस्था
6. माहितीसाठी टूर एस्कॉर्ट्स
7. सुरक्षा व्यवस्था

*📞☎️अधिक माहिती व बुकिंग साठी संपर्क:-*

*✈️🚘 7350 7350 91// 7350 534 534// 94 23 17 33 57*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/192294/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा