You are currently viewing वेंगुर्ल्यात शिशु-बाल आनंद मेळावा

वेंगुर्ल्यात शिशु-बाल आनंद मेळावा

वेंगुर्ल्यात शिशु-बाल आनंद मेळावा

रांगण्याची स्पर्धा, वेशभूषा व कविता पाठांतराचे आयोजन

वेंगुर्ले

आधार फाउंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने गुरुवार दि. १५ जानेवारी २०२५ रोजी नगर वाचनालय, वेंगुर्ला येथे दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत शिशु-बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ६ ते ११ महिन्यांच्या बालकांसाठी ३० फूट अंतराची विशेष “रांगण्याची स्पर्धा” होणार आहे. तसेच ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी “वेशभूषा स्पर्धा” आयोजित करण्यात आली असून प्रत्येक स्पर्धकाला कमाल २ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
याशिवाय ६ वर्षांवरील व ८ वर्षांखालील मुलांसाठी “कविता पाठांतर स्पर्धा” आणि ८ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी “मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा” घेण्यात येणार असून या स्पर्धांसाठी ३ मिनिटांचा वेळ असणार आहे.
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धा जिल्हा मर्यादित असून कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही.
अधिक माहितीसाठी किरण वेंगुर्लेकर, डॉ. वंदन वेंगुर्लेकर व अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आधार फाउंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा श्रीमती माधुरी वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा