निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न*
दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था, भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन*
आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था, भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या स्वच्छता मोहिमेमध्ये निवती किल्ल्यावरील बालेकिल्याच्या समोरील बाजू आणि खंदकाजवळील झाडी साफ करण्यात आली त्यामुळे आता बालेकिल्ला सहज दृष्टिक्षेपात येतो.
या मोहिमेत भाग्यश्री वाडकर, स्वप्निल साळसकर, यतिन सावंत, हेमालता जाधव, प्रसाद पेंडूरकर, गणेश नाईक यांनी सहभाग घेतला.
