निलेश राणे यांच्या निधीतून खडीकरण-डांबरीकरण कामांचा शुभारंभ; दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
मालवण :
आमदार निलेश राणेसाहेब यांच्या स्थानिक आमदार निधीतून चौके गावातील विविध रस्त्यांसाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण कामांचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी करण्यात आला.
शिवसेना तालुकाप्रमुख राजन गावडे यांच्या मागणी पाठपुराव्यातून चौके गावातील आमदार निलेश राणेसाहेब यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेले व निधी प्राप्त झालेले चौके कसाल मुख्य रस्ता ते थळकरवाडी रस्ता खडीकरण–डांबरीकरण शुभारंभ, चौके कसाल मुख्य रस्ता ते चौके हायस्कूल रस्ता खडीकरण–डांबरीकरण शुभारंभ, तसेच चौके कसाल मुख्य रस्ता ते देवतळीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण–डांबरीकरण करणे, चौके कुळकरवाडी रस्ता खडीकरण–डांबरीकरण करणे, चौके मांडखोलवाडी रस्ता खडीकरण–डांबरीकरण करणे, चौके बावखोलवाडी ते गणेश विसर्जन तळी रस्ता खडीकरण–डांबरीकरण करणे या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या सर्व रस्ते कामांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सहकार्य लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार निलेश राणेसाहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले.
