फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचा क्रीडाक्षेत्रात पुढाकार – जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
अनंत पिळणकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
फोंडाघाट
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच कणकवली तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) माननीय श्री. अनंत पिळणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर, सावंत सर, गणेश लाड, राजेंद्र बागवे, रासम सर, फड सर यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. तसेच रमेश राणे, देवेंद्र पिळणकर, निलेश रावराणे, महेश चव्हाण, उत्तम तेली, राजू वाघाटे, बाळा मसुरकर, तुषार पिळणकर, पार्थ पिळणकर आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभली.
या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शाळा व ज्युनिअर कॉलेजचे संघ सहभागी झाले असून, सहभागी संघांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
