You are currently viewing भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वडिलांचे दुःखद निधन
Oplus_16908288

भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वडिलांचे दुःखद निधन

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

पालकमंत्री नितेश राणे यांची सावंत कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

कणकवली :

भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे वडील मधुकर जयराम सावंत यांचे अलिकडेच दुःखद निधन झाले. या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे फौजदारवाडी येथील सावंत कुटुंबीयांच्या घरी जाऊन सोनू सावंत व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

या प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी कुटुंबीयांना धीर देत शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुनील सावंत, सादिक कुडाळकर, विजय कदम, राजू बांदल, किरण सावंत, संदीप घाडीगांवकर, दशरथ घाडीगांवकर, अनिल घाडीगांवकर, केतन घाडीगांवकर, प्रदीप घाडीगांवकर, सागर लाड, बाबू शेट्ये आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा