You are currently viewing संजीवनी हॉस्पिटलच्या पुढाकाराने दिविजा वृद्धाश्रमात मोफत वैद्यकीय शिबिर

संजीवनी हॉस्पिटलच्या पुढाकाराने दिविजा वृद्धाश्रमात मोफत वैद्यकीय शिबिर

संजीवनी हॉस्पिटलच्या पुढाकाराने दिविजा वृद्धाश्रमात मोफत वैद्यकीय शिबिर

कणकवली

आज दिविजा वृद्धाश्रमात संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या पुढाकाराने आश्रमातील आजी-आजोबांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वृद्धांच्या आरोग्याची सर्वंकष तपासणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी तसेच इतर आजारांची तपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत औषधे देण्यात आली तसेच योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी वृद्धांचे आरोग्य जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. संजीवनी हॉस्पिटलच्या या सामाजिक उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी समाधान व्यक्त केले.
दिविजा वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल डॉ. तायशेट्ये व संजीवनी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा