इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची ‘ग्रुप ॲक्सिडेंट गार्ड पॉलिसी’चा लाभ घ्यावा
सिंधुदुर्गनगरी,
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मार्फत ‘ग्रुप ॲक्सिडेंट गाड पॉलिसी सुरू करण्यात आली असून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या प्रिमियममध्ये उपलब्ध आहे. ही पॉलिसी अपघातामुळे होणारा मृत्यू, अपघाती रुग्णालयात दाखल होणे तसेच कायमस्वरुपी पूर्ण किंवा अंशत: अपंगत्व अशा परिस्थितींमध्ये आर्थिक संरक्षण प्रदान करते. ही योजना अत्यंत परवडणाऱ्या प्रिमियममध्ये, नागरिक- केंद्रित व सुलभ स्वरुपात उपलब्ध असून कामगार, शेतकरी, स्वयंरोजगार करणारे तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांसाठी विशेषत: उपयुक्त ठरणार असल्यची माहिती सिंधुदुर्ग विभागाच अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.
ग्रुप अॅक्सिडेंट गार्ड पॉलिसीचे प्रमुख लाभ
अपघाती मृत्यूच्या प्रसंगी विमा संरक्षण, अपघातामुळे रुगणालयात दाखल झाल्यास विमा संरक्षण, कायमस्वरूपी पूर्ण किंवा अंशतः अपंगत्वासाठी आर्थिक भरपाई, परवडणाऱ्या प्रिमियममध्ये अर्थपूर्ण विमा संरक्षण,सुलभ नोंदणी व सोपी, त्रासमुक्त दावा प्रक्रिया, मृत विमाधारकाच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुविधा
वार्षिक प्रिमियम विमा रक्कम (Sum Assured)
रु. ३२८ प्रति वर्ष रु. ५,००,०००/-, रु. ५४८ प्रति वर्ष रु. १०,००,०००/-, रु.७४९ प्रति वर्ष रु. १५,००,०००/-
(सर्व लाभ व अटी पॉलिसीच्या नियम व अटीनुसार लागू राहतील.)
या पॉलिसीचा लाभ आयपीपीबी बचत खातेधारकांनी नजीकच्या पोस्ट ऑफिस, पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून सहजपणे घेऊ शकतात. इंडिया पोस्टचे व्यापक जाळे विमा सेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची ग्रुप अॅक्सिडेंट गार्ड पॉलिसी ही सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्थैर्य व नागरिक-केंद्रित सेवा वितरण यांना चालना देणारी आहे. इंडिया पोस्ट व आयपीपीबी राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुरक्षित, परवडणाऱ्या तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही अधीक्षक डाकघर यांनी सांगितले.
