ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, समाजसेविका, कथाकार, निवेदिका, कथाकार, पर्यावरण प्रेमी, अनुपमा जाधव…
पुणे :
दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६, पुणे येथे कविता सादरीकरण व अध्यक्षपदी यासाठी के.एल.पोंदाच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, समाजसेविका अनुपमा जाधव यांची निवड करण्यात आली होती.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्य कर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतुने देशात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलची सुरुवात गतवर्षी झाली.जानेवारीत महोत्सवाचे दुसरे वर्ष असून त्या अंतर्गत पुणे येथे काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षस्थान लाभले, तसेच त्यांनी त्यांची माय सावित्री ही कविता सादर केली.
मूळ संकल्पना व मार्गदर्शन प्रमुख, कवी विजय वडवेराव सर आयोजित, देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत, दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल, पुणे २०२६ घेण्यात आला. या फेस्टिव्हलआयोजक विजय वडवेराव यांनी खूप मेहनत घेतली.प्रत्येकाची विचारपूस केली, तसेच फेस्टिवल मध्ये चहा, नास्ता, जेवण , प्रत्येक सहभागी झालेल्यांना दिले गेले.
तसेच सन्मान केला गेला. विजय वडवेराव यांच्या कार्याने फेस्टीवल मध्ये आनंदाचे जणू उधाण आले.
अनुपमा जाधव यांना देखील संविधानमय शालेय पॅड, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, साडी देऊन सन्मान करण्यात आला.
त्यामुळे पालघर जिल्हासह, महाराष्ट्रातील साहित्य वर्तृळातून
त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनुपमा जाधव यांची प्रकाशित पुस्तके – समुद्रसंगीत, वहिवाट,रानझरा, हे काव्यसंग्रह तर, अनुबंध हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
तसेच आकाशवाणी मुंबई, नाशिक, पुणे अशा अनेकविध ठिकाणी त्यांनी कविता वाचन, कथाकथन, पर्यावरण जनजागृतीचे कार्यक्रम केले आहेत.
त्यांनी तीन गितांची निर्मिती केली आहे.
स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीत
चला प्रदूषण दूर करु या!
गौरव गीत, अशा गीतांची निर्मिती केली आहे. डहाणू नगरपरिषदेच्या घंटा गाडीवर देखील त्यांचे गीत वाजवले आहे.
असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांचं आहे.
सदर निवडीसाठी व मिळालेल्या सन्मानासाठी त्यांच्यावर नातेवाईक तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री सोपान इंगळे सर, उपमुख्याध्यापिका सौ.रसिका घागस मॅडम, काॅलेजचे उपप्राचार्य श्री.शशिकांत चव्हाण सर, पर्यवेक्षिका सौ.मनिषा पटेल मॅडम, शिक्षक बंधू व भगीनी तसेच पालक वर्ग, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले. परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
