You are currently viewing राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

या दिवशी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये पुढीलप्रमाणे उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

             ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा, चरित्र व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करणे. क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅलीचे, मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांसंदर्भातील नियमावली, ऑलिंपिक स्पर्धासोबतच अन्य महत्त्वाच्या स्पर्धा, त्यामधील यशस्वी खेळाडू व अन्यबाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन. तसेच ऑनलाईन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद. विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने आयोजित करून विजेत्यांना पुरस्कार वितरण करणे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करणे. क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडा शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडू, शालेय महाविद्यायीन विद्यार्थी- विद्यार्थींनी, पालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिक यांच्यासोबत क्रीडाक्षेत्र तसेच त्यामधील करीअर संधींबाबत परिसंवाद व चर्चासत्रे आयोजन करणे.

            वरील उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून त्याचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या sindhusports1@gmail.com या ई-मेलवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा