*भाजपाच्या विकासकामांचा बांद्यात धडाका*
*बांदा येथे बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन संपन्न*
बांदा
बांदा बांदेश्वर मंदिर जवळील होळीचा खुंट येथील महत्त्वाच्या बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन आज येथील जेष्ठ नागरिक दयानंद साळगावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या ठिकाणी गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असायचे.याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत बांदा उपसरपंच आबा धारगळकर व भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी याकरीता मागणी व पाठपुरावा करत काम मंजूर करून घेतले. बांदा शहरात भाजपाच्या विकास कामांच्या भूमिपूजनांचा धडाका चालू असून याप्रसंगी बोलताना उपसरपंच आबा धारगळकर यांनी सांगितले की, बांदा-पत्रादेवी रस्त्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांमार्फत प्रयत्न करत असून लवकरच ते काम देखील मार्गी लावू असा विश्वास आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच प्रियांका नाईक,भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, बांदा उपसरपंच आबा धारगळकर, शहराध्यक्ष बाबा काणेकर, दयानंद साळगावकर, दर्पण आळवे, शैलेश केसरकर, निखिल मयेकर, ऋषिकेश सावंत, श्री महाबळ, वामन बांदेकर, उत्तम काका, दाजी परब, श्रीमती घोडगे, सतीश चव्हाण, सूर्यकांत मुळये, बेनक सावंत तसेच परिसरातील नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
