You are currently viewing दोडामार्गात ‘बाहुबली’ हत्तीचा धुमाकूळ
Oplus_16908288

दोडामार्गात ‘बाहुबली’ हत्तीचा धुमाकूळ

बांबर्डे गावात शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी

दोडामार्ग :

दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करण्यासाठी विविध आंदोलन होत असतानाही दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव सुरूच आहे. वन विभागाने जंगली हत्तींचा कळप जंगलातच रोखण्यासाठी उपाययोजना केल्या असल्या, तरी रात्रीच्या वेळी हे प्रयत्न अपुरे ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हत्तींच्या कळपाने बांबर्डे गावात प्रवेश करत शेती व बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काल रात्री बांबर्डे येथील तुकाराम गावडे यांच्या शेतात ‘बाहुबली’ हत्तीने धुडगूस घातला. चार ते पाच वर्षांच्या मेहनतीतून वाढवलेली नारळ, सुपारी, केळी व अन्नसाठ्याची पिके एका रात्रीत उद्ध्वस्त झाली. संपूर्ण शेत नासधूस झाल्याने शेतकरी कुटुंब मानसिक धक्क्यात सापडले आहे.
अशा घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा संयम आता सुटण्याच्या मार्गावर असून तातडीने ठोस व परिणामकारक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी दत्ताराम देसाई यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा