मुख्याधिकारी यांनी भूमिका केली स्पष्ट
सावंतवाडी
पालिका प्रशासनाने आज पुन्हा एकदा कारवाई केल्यानंतर भाजी विक्रेते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी याना घेराव घालत याबाबत जाब विचारला होता. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, नियमानुसार भाजी विक्रेत्यांनी आपण रस्त्यावर बसू देवू शकत नाही. अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी याबाबत भाजी विक्रेत्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात द्यावे असे देखील सांगितले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच त्यांना नेमून दिलेल्या जागेवर बसावे अन्यथा कारवाई केली जाईल अशी सूचना दिली होती असे स्पष्टीकरण देखील त्यानी यावेळी दिले आहे.