You are currently viewing शनिवार, दिनांक १० जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

शनिवार, दिनांक १० जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

*शनिवार, दिनांक १० जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर*

पिंपरी

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल झोन ७, ८, ९ आयोजित इयत्ता दहावीच्या (एस. एस. सी.) मार्च २०२६ मधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे नि:शुल्क नावनोंदणी करून ठीक १२ वाजता
‘परीक्षेला सामोरे जाताना’ या नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे एमजेएफ ला. श्रेयस दीक्षित (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), विशेष उपस्थित ममता शिंदे (सहा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षणविभाग) आणि अध्यक्ष एमजेएफ ला. प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार असून लायन्स क्लब इंटरनॅशनल झोन ७ चेअरमन हिरामण राठोड, झोन ८ चेअरमन मुकुंद आवटे, झोन ९ चेअरमन उज्ज्वला कुलकर्णी, उपक्रम समन्वयक अनुजा करवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

या मार्गदर्शन शिबिरात एसएससी बोर्ड सदस्य डॉ. सुलभा विधाते (शास्त्र), डॉ. जयश्री अत्रे (गणित) आणि अर्चिता मडके (एक्झाम टेक्निक्स) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या गुणात १००% वाढ होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला असून शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना नि:शुल्क सराव प्रश्नोत्तर संचाचे वितरण करण्यात येईल. इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी अधिक माहितीसाठी
संपर्क क्रमांक ९०४९९९२८०७ किंवा
९०४९९९२८०९
यापैकी कोणत्याही एका क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजक लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा