You are currently viewing संत दासगणू महाराज

संत दासगणू महाराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संत दासगणू महाराज*

 

संत चालते बोलते परमेश्वर आहेत

दासगणू सांगती संतांचे उपकार अनन्यIIधृII

 

दासगणूंचा जन्म अहिल्यानगर ओकोळनेरांत

माता सावित्रीबाई पिता लाभले दत्तात्रेय

आजोबांनी तुंदीलाचे गणेश केले नामकरणII1II

 

बालपण गेले गरीब परिस्थितीत

बालपणापासून त्यांना काव्याची आवड

स्वाभिमानी उत्तम देह यष्टी करिती मेहनतII2II

 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली नोकरी क्षमता पाहून

सेवा चालू असता करिती लोकनाट्य काव्य लेखन

संत कवी महिपती जगले संन्यासी वृत्तीनंII3II

 

गुरू लाभले वामन शास्त्री इस्लामपूरकर

गुरुंनी शिवमंत्र दिला केले अनुग्रहित

गुरु आज्ञेन पंढरपुरी प्रतिवर्षी वारी करीतII4II

 

अध्यात्माचा गाढा अभ्यास मांडायचे तत्त्वज्ञान

दासगणू रसाळ वाणीने करिती कीर्तन

बाबांच्या आशिषे बनले प्रमुख शिर्डी संस्थानII5II

 

गजानन महाराज स्तोत्र लिहिले विजय ग्रंथ

पंच्याऐशी संत चरित्र आरती कथा मृत

शेगाव शिर्डी संस्थांची महती वाढवली शानII6II

 

भक्तीरसामृत समृद्ध विजय सारामृत

उपनिषदावर टीका अमृतानुभव शांडिल्य सूत्र

दासगणूचे लिखाण भक्तांना होत वरदानII7II

 

©️कवी.श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा