*मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवार सौ. सुजाता पाटेकर यांच्या प्रचारफेरीत मा.आम. वैभव नाईक झाले सहभागी*
*विविध भागात मतदारांच्या गाठीभेटी घेत सौ. पाटेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे केले आवाहन*
मुंबई महानगरपालिका निवडणूकितील प्रभाग क्र. ५ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ.सुजाता उदेश पाटेकर यांच्या निवडणूक प्रचारफेरीत काल बुधवारी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवत प्रभाग क्र.५ मधील विविध भागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी सौ. सुजाता पाटेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन वैभव नाईक यांनी मतदारांना केले. याप्रसंगी दहिसर मागाठणेचे विभागप्रमुख,माजी नगरसेवक उदेश पाटेकर, मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर यांसह मुंबईतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
