आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; कुडाळ–मालवणमधील १७ कामांना मंजुरी
कुडाळ :
आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कुडाळ तालुक्यातील १४ कामांसाठी ५ कोटी ७० लाख रुपये, तर मालवण तालुक्यातील ३ कामांसाठी १ कोटी रुपये असा एकूण ६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आमदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
कुडाळ, मालवण तालुक्यातील मंजूर कामे व खर्च :
२१,५६,८९०.०० – वर्दे (मांगरवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
७८,७१,६६३.०० – माणगाव ढोलकरगाव येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२१,५५,५०७.०० – चेंदवण (वेलवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२५,८६,३३६.०० – चेंदवण-२ (वेलवाडी स्मशानभूमी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
४४,८५,९२६.०० – हुमरस (वारंगवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२४,८८,१८८.०० – पावशी मिटक्याची वाडी (नालंगवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
३०,१०,६१७.०० – कुंदे (परबवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
५६,४१,८७८.०० – घावनाळे (गावठणवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
३०, ५८,३७५.०० – रायगाव माड्याचीवाडी येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२९,८२,४३८.०० – जांभवडे (गावनमाळा) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२८,९७,६१९.०० – निवजे (चव्हाटवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२९,८२,४३८.०० – मोरे (मधलीवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
६४,८४,५७१.०० – पडवे (थोरले तलाव) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
८१,७४,३५३.०० – पणदूर (माऊली मंदिर) येथे को. प. बंधारा बांधणे
५६,२६,८१७.०० – कातवड (पाळशीवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२१,०७,४३४.०० – रामगड-१ येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
२२,३७,७७४.०० – रामगड-२ येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे
या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली असून, यामुळे संबंधित सर्व गावांमध्ये सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
