बांदा मराठा समाजातर्फे गौरव
सावंतवाडी / बांदा :
सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा येथील उद्योजक आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजच्या वतीने सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार समारंभ सन्मानपूर्वक पार पडला.
आनंद गवस हे गेल्या अनेक वर्षांपासून सॉ मिल व्यवसायात सक्रिय असून, आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरावर नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येताच बांदा परिसरासह संपूर्ण मराठा समाजात समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी त्यांनी बांदा मराठा समाज मंडळात उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत सामाजिक कार्यातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, अक्षय परब, प्रभाकर गावकर, माजी खजिनदार राकेश परब, जय पटेकर-सावंत, मनोज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
