सीडीएस (CDS) परीक्षा २०२६ साठी नाशिक येथे तज्ञ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती
सिंधुदुर्गनगरी
लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या Combined Defence Services Examination सीडीएस (CDS) वर्ष २०२६ च्या तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे तज्ञ शिक्षकांची रु. ३०० प्रति तासिका प्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
CDS-६६ कोर्स साठी प्रशिक्षण कालावधी १९ जानेवारी २०२६ ते ०३ एप्रिल २०२६, तर CDS-६७ कोर्स साठी १५ जून २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ असा राहणार आहे.
इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान-१ (सामान्य ज्ञान, भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण) तसेच सामान्य विज्ञान-२ (अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या विषयांसाठी तज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे. अर्जदार संबंधित विषयातील पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक असून, स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वरील अर्हता संपन्न तज्ञ प्राध्यापकांनी संपूर्ण कागदपत्रांसह दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन ले. कर्नल विलास शंकर सोनवणे (नि.), प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
