You are currently viewing पाटणकर गॅस सर्व्हिसची घवघवीत कामगिरी

पाटणकर गॅस सर्व्हिसची घवघवीत कामगिरी

पाटणकर गॅस सर्व्हिसची घवघवीत कामगिरी;

गोवा विभागात सलग नवव्यांदा ‘बेस्ट डिस्ट्रीब्यूटर’

सावंतवाडी
येथील पाटणकर गॅस सर्व्हिसने आपल्या दर्जेदार सेवेची परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२४–२५ या वर्षासाठी गोवा विभागाचा ‘बेस्ट डिस्ट्रीब्यूटर’ हा मानाचा पुरस्कार पटकावत संस्थेने सलग नवव्या वर्षी हा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात पाटणकर गॅस सर्व्हिसने एकूण सात विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
४१ वर्षांच्या अखंड व उत्कृष्ट सेवेसाठी संस्थेला ‘दीर्घ सेवा पुरस्कार – ४१ साल बेमिसाल’ देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘कोकणरत्न बेस्ट डिस्ट्रीब्यूटर ऑफ द टेरिटरी’, ‘एक्सीलन्स इन डोमेस्टिक सेल्स’ आणि ‘बियॉंड एलपीजी का बादशहा’ या श्रेणीत प्रथम उपविजेता पुरस्कार मिळवण्यात यश आले.
नवीन गॅस कनेक्शन नोंदणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘एन. सी. – शेर’ आणि ‘अविरत ऊर्जा – बेस्ट इन डीबीसी एनरोलमेंट’ हे उपविजेता पुरस्कारही संस्थेने पटकावले. याशिवाय ‘स्मार्ट कनेक्शन बियॉंड एलपीजी’ या श्रेणीतही पाटणकर गॅस सर्व्हिसला विजेतेपद घोषित करण्यात आले.
या नेत्रदीपक यशाबद्दल पाटणकर गॅस सर्व्हिसने भारत पेट्रोलियमच्या सर्व अधिकारीवर्गाचे तसेच आपल्या लाखो समाधानी ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही अधिक दर्जेदार व ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा