You are currently viewing जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल महोत्सव उपयुक्त

 – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

 सिंधुदुर्गनगरी

 समाजाच्या मुख्य प्रवाहातील बालकांना शिक्षण, कला व कौशल्य विकासाच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. मात्र निराधार व निराश्रित बालकांना या संधी हमखास मिळतीलच असे नाही. अशा बालकांच्या कला, क्रीडा व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती पुंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मनोज भोगटे बाल विकास प्रकल्प अधिकारी , नितीन काळे  जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ, ऍड.अरुण पणदूरकर सदस्य, बालकल्याण समिती, श्रीमती प्राध्यापिका माया रहाटे सदस्य बालकल्याण समिती , अमर निर्मळे सदस्य, बालकल्याण समिती, श्रीमती कृतिका कुबल, सदस्य बाल न्याय मंडळ, नागेश ओरस्कर अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती ओरस बुद्रुक, श्रीमती अनुष्का ओरोसकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्रीमती स्वाती ओरस्कर सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती, श्रीमती हर्षाली पाटणकर मुख्याध्यापिका जि प पूर्ण प्राथमिक शाळा ओरस बुद्रुक, रमाकांत परब देवस्थान कमिटी अध्यक्ष, श्रीमती आशा मुरमुरे ओरस सरपंच, पांडुरंग मालवणकर, उपसरपंच ओरोस बुद्रुक, ग्राम विस्तार अधिकारी ओरस बुद्रुक श्री चव्हाण,मिलिंद बोर्डवेकर वैद्यकीय अधिकारी शासकीय मुलांचे निरीक्षण गृह बालगृह ओरोस सिंधुदुर्ग नगरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, मुलांना घडविणे हे शिक्षक व पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा बाल महोत्सवांची नितांत गरज आहे.  या महोत्सवात बालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहणे आनंददायी असून, यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी महिला व बाल विकास विभागाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बालगृहातील मुलांना प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिनगारे यांनी केले, तर अधीक्षक बी. जी. काटकर यांनी आभार प्रदर्शन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा