धाराशिव :
धाराशिव येथील समाज विकास संस्थेच्या वतीने देवबेट देवी मंदिर धानोरी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणी वृक्ष लागवड करत असताना ते बोलत होते.
देवबेट देवस्थान समिती, ग्रामपंचायत धानोरी, समाज विकास संस्था आणि आरएसबी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3000 झाडे लावून या ठिकाणी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा मोठा उपक्रम सुरू केला. श्री व्यंकट पोतदर यांनी स्वतः खर्च करून, वड पिंपळ, चिकू,आंबा,असे महावृक्ष लावून देण्याचा संकल्प केला.आणि आज रोजी 51 झाडे लावून निसर्ग संरक्षणामध्ये आपला वाटा उचलला.
याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी मॅनेजर कासार आष्टा निवासी श्री मदने हे प्रमुख अतिथी आणि सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.
समाज विकास संस्थेचं पहिलं बँक खाते महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तुर या ठिकाणी उघडून मी सामाजिक प्रक्रियेला योगदान दिल्याचं त्यांनी समाधान व्यक्त केलं. बघता बघता समाज विकास संस्थेचा वटवृक्ष झाल्याचे ते बोलत होते. याप्रसंगी वडगाव (गा)चे माजी सरपंच फुलसुंदर आणि त्यांचे मित्र उपस्थित होते.
भूमिपुत्र वाघ यांनी नाबार्ड बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व या प्रकल्पामध्ये स्वयंसहायता समूह निर्मिती आणि सक्षमीकरण या प्रकल्पामध्ये श्री पोतदार, आणि श्री मदने नाबार्डचे डी डी एम, निशिकांत मुपीड, श्रीकांत भावे, प्रल्हाद जोशी अशा अनेक जिल्हा विकास अधिकारी या सर्वांच्या सहभागातून खूप मोठे आर्थिक सामाजिक शैक्षणिक चळवळ उभी राहिल्याचे भूमिपुत्र वाघ यांनी समाधान व्यक्त केलं.
सध्या ही संस्था देवबेट देवी मंदिर या ठिकाणी 3000 झाडाचं संवर्धन करत असल्याचे संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी सांगितले.
