सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत
पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण
प्रेस क्लब च्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा
सावंतवाडी :ष
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब च्या वतीने सावंतवाडीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली यावेळी चव्हाण यांनी सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी प्रेस क्लब चे अध्यक्ष अनंत जाधव संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे सचिव राकेश परब खजिनदार संदेश पाटील आनंद धोंड शैलेश मयेकर प्रा.रूपेश पाटील मदन मुरकर सहदेव राऊळ साबाजी परब निखिल माळकर संजय पिळणकर विशाल पित्रे यशवंत माधव,लक्ष्मण आढाव,रेवती वालावलकर सुनिल आचरेकर प्रशांत मोरजकर नाना धोंड नितीन गावडे आशिष धोंड आदि उपस्थित होते.
यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील महत्त्व सांगितले आपण देवगड येथे असतना नेहणी पत्रकार दिनी पोभुर्ले ला जात असे त्यांचे कार्य अफाट आणि उंचीचे होते असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले तसेच त्याच्या कामाचे तसेच कार्याचे कौतुक केले.
यावेळी सिताराम गावडे यांनी सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या कामाची माहिती देत असतना हा प्रेस क्लब एका विशिष्ट परस्थीतीत नावा रूपास आला असून प्रेस क्लब चे महत्व ही त्यांनी पटवून दिले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रजिस्टर संघटना असून प्रेस क्लब च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आपणास यश आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.पत्रकाराचे कार्य महत्वाचे असते तेवढेच काम हे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे असते त्यामुळे ते सर्व जण आमच्या प्रेस क्लब चे सदस्य आहेत असेही यावेळी गावडे यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष अनंत जाधव यांनी प्रेस क्लब च्या माध्यमातून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत असून सामाजिक दृष्टिकोन नजरे समोर ठेवून काम करत आहोत सदस्य कमी असले तरी काम चांगले आहे असे स्पष्ट केले.यावेळी रूपेश पाटील यांनी प्रेस क्लब च्या कामाबद्दल गौरव उद्गार काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश परब यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत संदेश पाटील आनंद धोंड यांनी केले.
