You are currently viewing श्रीम कोठेकर योगिता यांच्या ‘ शिदोरी संस्काराची’ या पुस्तकाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन

श्रीम कोठेकर योगिता यांच्या ‘ शिदोरी संस्काराची’ या पुस्तकाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन

श्रीम कोठेकर योगिता यांच्या ‘ शिदोरी संस्काराची’ या पुस्तकाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन

श्रीम कोठेकर योगिता यांच्या ‘ शिदोरी संस्काराची’ या पुस्तकाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन*

विद्यार्थ्यांना मूल्यांचे महत्व सांगणारे पुस्तक म्हणजे शिदोरी संस्काराची . श्रीम कोठेकर योगिता या शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभागाच्या शिक्षिका यांचे ४ थे पुस्तक ‘शिदोरी संस्काराची ’ याचे प्रकाशन रविवार, दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथील प्रकाशन कट्टा आणि कविकट्टावरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रकाशन कट्टा प्रमुख घनश्याम पाटील, कविकट्टा अध्यक्ष राजन लाखे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, कोठवळे मॅडम, सौ कारंजकर , श्री माडगूळकर सर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड कार्यकारिणी सदस्य किरण लाखे आणि सुनीता बोडस यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘मूल्यांचे संवर्धन करणारे हे पुस्तक’ विद्यार्थी, पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे असे जेष्ठ साहित्यीकांनी आपले मत मांडले.

‘शिदोरी संस्काराची’ या शीर्षकातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतांना त्यांच्या जवळ असणारा मूल्यांचा ठेवा , समाजात जीवन जगतांना पावलोपावली आपले वर्तन,आचार विचार दाखवणारा मार्ग,जीवनाला दिशा देणारे,परिवर्तन घडवून आणणारे , चांगला संदेश देणारे ,सकारात्मक दृष्टीकोन वाढवणारे असे हे पुस्तक आहे यातील चारोळ्या अत्यंत समर्पक शैलीत मांडल्या आहेत. निसर्ग, इतिहास, अध्यात्मिक मूल्य , कौशल्य आणि शिक्षण यांचा सुरेख संगम या चारोळ्यांच्या माध्यमातून दिसून येतो.

श्रीम कोठेकर योगिता या शिक्षिका, कवयित्री, लेखिका म्हणून परिचित आहे. त्यांची आजवर चार पुस्तके प्रकाशित आहेत. ‘ काव्ययोग ‘ मनातल्या कविता’, ‘ संस्कार शिदोरी’, आमचे अभिमान ’ यासारखी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांचे अनुभव,अध्ययन अध्यापन,विविध शिक्षण परिषदा, साहित्य संमेलने आणि कार्यशाळांतील सहभाग त्यांच्या लेखनाला व्यापक दृष्टिकोन देतो.विद्यार्थ्यांमध्येही त्यांनी कविता लेखनाची आवड निर्माण केली आहे. “शिदोरी संस्काराची” हे पुस्तक नक्कीच येणाऱ्या भावी पिढीसाठी मूल्यवर्धनाचे काम करेल अशी आशा अनेक साहित्यीकांनी व्यक्त केली आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा