*शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कणकवली शिवसेना शाखेत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी*
कणकवली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची सावली आणि शिवसैनिकांची माऊली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली येथील शिवसेना शाखेत महिला आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कणकवली महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, विलास गुडेकर, दिव्या साळगावकर,प्रमोद सावंत,रोहिणी पिळणकर आदि उपस्थित होते.
