पणदूर :
मुंबई-गोवा चौपदरी महामार्गमुळे विस्थापित झालेल्या पणदुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ नूतन इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषद बांधकाम सभापती सौ. सावी लोके यांच्या हस्ते उद्या बुधवारी १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. समिधा नाईक, जि. प. सदस्य रणजीत देसाई, भाजपा मंडळ अध्यक्ष गोपाळ हरमलकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत, सरपंच दादा साहिल, उपसरपंच आबा सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिवराम पणदूरकर, किरण मोरे, अंकिता राऊळ, अनघा गोडकर, सुविधा सावंत, मयुरी पणदूरकर, पोलीस पाटील देऊ सावंत, ग्रामसेवक सपना मसगे आदी उपस्थित राहणार आहेत.