महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे मंगळवार दि. 6 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6.42 वाजता कणकवली रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कणकवलीकडे प्रयाण. सकाळी 6.52 वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथून वाहनाने पोंभुर्ले (जांभे- देऊळवाडी), ता. देवगडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता “दर्पण” आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक सभागृह,पोभुर्ले (जांभे-देऊळवाडी)ता. देवगड येथे आगमन व “दर्पण” पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती.दुपारी 12 वाजता पोंभुर्ले (जांभे-देऊळवाडी) ता. देवगड येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथून वाहनाने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (MOPA),गोवाकडे प्रयाण.
