You are currently viewing देवानंद खवणेकर यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटकपदाची जबाबदारी
Oplus_16908288

देवानंद खवणेकर यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटकपदाची जबाबदारी

सावंतवाडी :

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी सावंतवाडी येथील देवानंद खवणेकर यांची जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते खवणेकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी ओबीसी जिल्हाप्रमुख सुधा कवठणकर, नितीन गावडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्ती जाहीर होताच खवणेकर यांच्यावर पक्षातील सहकाऱ्यांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव झाला.

पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रियपणे पक्षाशी जोडणे आणि शिवसेनेचा जनसंपर्क वाढवणे ही महत्त्वाची जबाबदारी आता खवणेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडी परिसरात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा