फोंडाघाट महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी निवड
कणकवली
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दिनांक १७ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आव्हान – आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील तीन एन.एस.एस. स्वयंसेवकांची निवड झाली आहे.
नुकत्याच कला आणि वाणिज्य महाविद्यालय, खारेपाटण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी शिबिरात फोंडाघाट महाविद्यालयातील शुभम सावंत, मानसी बाणे व किरण कदम या तीन स्वयंसेवकांची निवड झाली.या निवडीबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी निवड झालेल्या स्वयंसेवकांचे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. जगदीश राणे व डॉ. बाजीराव डाफळे यांचेही विशेष अभिनंदन केले…
