निरवडे मेस्त्रीवाडी प्रिमियर लीगची उस्ताहात सांगता
सावंतवाडी :
विश्वकर्मा युवक कला क्रीडा मंडळ मेस्त्रीवाडी निरवडे येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी भेट दिली.
यावेळी अंतिम सामान्यचा नाणेफेक त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक खेळाडूच्या मागे भक्कमपणे सदैव उभा राहू असे श्री गावडे म्हणाले.
यावेळी निरवडे उपसरपंच पेडणेकर, रोहन मल्हार, गेळे सरपंच सागर ढोकरे तसेच मेस्त्रीवाडीतील सर्व आयोजक मंडळ व सर्व खेळाडू, निरवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
