*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल यांनी राष्ट्रीय पोलीस दिनाच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*
*”पोलीस”*
सर्व समाजाने पोलिसांचा राखावा सन्मान
राष्ट्र घडणीत त्यांचे बहुमूल्य योगदानIIधृII
सद रक्षणार्थ दुर्जनांवर लक्ष ठेवून
रात्रंदिवस कर्तव्य बजावे सांभाळी मान
सर्वां आश्वासक करी भयमुक्त वातावरणII1II
पोलीस धर्मातीत भेदाभेद राही विसरून
क्षणोक्षणी कार्य तत्पर बुद्धी समतोल ठेवून
डबा असूनही कधी उपाशी राही सेवेत मग्नII2II
घरदार कुटुंब अडचणी जाई विसरून
कर्तव्य बजावे कधी घरच्यांचा रोष पत्करून
रजा असता खात्याने बोलविता जायी धावूनII3II
समाजाचे उत्सव साजरे होता माने समाधान
इतरांचा आनंद राखी आबाधीत मानी धन्य
कार्यक्रम संपेपर्यंत थांबे अलूप राहूनII4II
प्रसंगी कोणत्याही आपत्तीत देई झोकून
संकटात उभा ठाके राखी प्रसंगावधान
कशाचीही तमा न ठेवता पचवे मानापमानII5II
पोलीस समाज ताणलेल गुंतलेलं नातं
पोलीस फक्त कायद्याचे रक्षक नसतात
समाजाच्या भावना अपेक्षा प्रश्नांचं प्रतिबिंबII6II
सदा सतर्क विश्वासार्ह नेक राही सावधान
धैर्यवान स्वातंत्र्य जपणारा करी संरक्षण
खाकी वर्दी धारी जीवन करी राष्ट्रार्पणII7II
©️कवी.श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
