*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*
*स्वयंसेवी संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऱ्हासाची कारणे*
(सिंहावलोकन )
1985 ते 2025 चा काळ म्हणजे सर्वसाधारण 40 वर्षाच्या चढउताराचा काळ.या कार्यकालाचा अभ्यास केला असता/ चिंतन केलं असतं/ सिंहावलोकन केलं असता.खालील प्रमाणे काही कारणे समोर येताना दिसतात.
त्या आधी मागोवा घेणे आवश्यक वाटते. ते आधी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1985 ते 2000 चा सर्वसाधारण काळ डोळ्यासमोर येतो,तेव्हा किमान महाराष्ट्रात तरी अनेक चळवळी सातत्याने सक्रिय होताना, सतर्क होताना, क्रांतिकारी आवाज उठविताना, हकाची भाषा बोलताना आपण पहिलेल्या आहेत.या कार्यकालमध्ये दलितांवर होणारे त्याचार,आणि त्यांच्या हक्काच्या लढाया,वेटबिगारांचे प्रश्न,बाल कामगारांचे प्रश्न,स्थलांतरीत ऊसतोड मजूर,आदिवासींचे प्रश्न, जल,जंगल,पाण्याचे प्रश्न,स्त्रियांच्या वरील अत्याचार, हुंडाबळीचे प्रश्न, झोपडपट्टीतील लोकांचे हक्क अधिकार स्थलांतरनाचे प्रश्न, मागासवर्गीय वसतीगृहाच्या लढाया, शासकीय योजनेचा प्रचार प्रसार आणि लाभधारकांच्या पर्यंत योजनेची माहिती.अशा अनेक प्रश्नांच्यावरती आवाज उठवणारा समाज होता.समाजा सोबत लोक होते.स्वयंसेवी संघटना होत्या.आणि त्या काळामध्ये स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्त्याच्या पाठीमागे मोठे बळ होते.राजसत्तेवर आणि प्रशासनावरती कार्यकर्त्याचा दबदबा होता.रिस्पेक्ट होता.भीती होती.आणि आदरयुक्त सहकार्याची भावना सुद्धा होती.वाडी,तांडा,वस्ती,गाव त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा खूप सकारात्मक होता.कोणी कार्यकर्ता गावात आला तर गावातील लोक जमा व्हायचे.त्याना समजून घ्यायचे.जेऊ खाऊ घालायचे.परत वाटं लावायला चार सहा किलोमीटर चालत जायचे.तो काळ,त्या कार्यकाळातील कार्यकर्ता, त्याच्या कार्यावर आणि समाजावर असणाऱ्या निष्ठा.तसेच लोक सुद्धा सद्भावणीक होते.
काळ बदलत जाईल तसा समाज बदलत गेला.सरकारी अधिकारी बदलत गेले.राजसत्तेतले आमदार खासदार बदलत गेले.कार्यकर्ता बदलत गेला.समाजातली प्रश्न बदलत गेले.हे सर्व बदल मोठ्या झपाट्याने घडत गेलेले दिसतात.यामध्ये महत्त्वाचा वाटा म्हणजे दूरदर्शन आणि मोबाईल.जगात घडणारी प्रत्येक गोष्ट थेट मोबाईल आणि टीव्ही दिसायला लागली. समाज जागृत झाला.संघटित झाला. हक्क आणि अधिकाराची भाषा बोलू लागला.दळणवळणाची साधने झपाट्याने बदलत गेली.त्यामुळे आत्ता लोक एक सेकंदात आपल्या घरात,गल्लीत, गावात घडणारी घटना समाजासमोर ठेवू लागले.त्यामुळे अडचणी सुटायला कदाचित मदत झाली.
तर दुसऱ्या बाजूला जातिवंत कार्यकर्त्याची फळीची पीछेहाट होताना दिसत आहे.कार्यकर्ता ऐशआरामी बनायला लागला. त्यालाही श्रीमंत होण्याची स्वप्ने पडायला लागली.काही कार्यकर्ते श्रीमंतही झाले.बंगले आले,गाड्या आल्या,परिस्थिती बदलून गेली.हे झालेले बदल सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याला विश्वासाला समाजाने दिलेला खूप मोठा पाठिंबाच आहे.असे म्हणावे लागेल.ते वावगे असन्याचं कारण नाही. तर अनेक कार्यकर्त्यांची ससेहोलपट सुद्धा झालेली दिसते आहे.आता ससे होलपट का झाली असेल!!त्यावेळी समाज बरोबर होता.मदत करणारे लोक बरोबर होते.मदत करणाऱ्या एजन्सी बरोबर होत्या.त्याचं महत्त्वाचं कारण आपण विचारात घेतला असता.त्यामुळे तो कार्यकर्ता किमान समाजामध्ये उठावदार दिसत होता.परंतु मदत देणाऱ्या संस्था हतबल झाल्या. समाज बाजूला सरला. मदत करणाऱ्या एजन्सी मागे सरल्या.काळासोबत पुढे जाण्याची क्षमता कार्यकर्त्याची हटली गेली.त्यात शिक्षणाचा अभाव, विचाराचा अभाव,अंग चोरून केलेली कामं, दूरदृष्टीचा अभाव, मिळालेली रिसोर्सेस जतन करून पुढच्या कामी आणण्यासाठी करावयाचे सूनियोजनाचा आभाव.सोबत अनेक कार्यकर्त्यांनी राजकारनात जाणं पसंत केलं. त्यामुळे क्षेत्रात अनेक बदल झालेले दिसून येतात.तर दुसऱ्या बाजूला राजसत्तेत सहभागी झालेला युवा वर्ग.हेही खूप महत्त्वाचे कारण आज तरी नक्की दिसते आहे.
असो अनेक विषय, अनेक प्रश्न बदलत जाणारा समाज,अशा अनेक कारणाने सामाजिक चळवळी डाव्या विचाराच्या चळवळी,डाव्या विचाराचे कार्यकर्ते,आज तरी हातबल झालेले दिसून येतात.आज आवाज उठवणारे कार्यकर्ते,आवाज उठवणाऱ्या स्वयंसेवी संस्था याची ससेहोलपट होताना दिसते आहे.
ही मरगळ भविष्यात अशीच चालत राहिल्यास येणारा काळ हा महाराष्ट्राला पुरोगामीत्वाचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल का हा मात्र प्रश्न समोर दिसतो आहे.
सामाजिक चळवळीमध्ये युवावर्ग सहभागी होताना दिसत नाही. समजाच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्था सामाजिक चळवळी कार्य करताना दिसत नाहीत.राजसत्तेमध्ये पदाचे विलोभन आहे. पैशाचे विलोभन आहे.अनेक कार्यकर्ते राज्यसत्तेमध्ये जाऊन काही मिळतय का या अशाने आकर्षित झालेले आहेत.यामुळे सामाजिक बदलाच्या चळवळीकडे युवा वर्गाचं दुर्लक्ष झालेले दिसते आहे.यातूनच सामाजिक संस्थांचा ऱ्हास होताना दिसतो आहे…
येणारा काळ,येणारी पिढी,येणारे लोक समर्थपणे त्यांच्या विकासाला कसा न्याय देतील याची आपण वाट पाहणे एवढाच एक मार्ग दिसतो आहे.
