You are currently viewing माजगावच्या सातेरी जत्रोत्सवात भाविकांची मांदियाळी
Oplus_16908288

माजगावच्या सातेरी जत्रोत्सवात भाविकांची मांदियाळी

भाजप युवा नेते विशाल परब यांची देवदर्शनाला उपस्थिती; विधिवत पूजा, सत्कार आणि ग्रामस्थांशी संवाद

सावंतवाडी :

माजगावचे जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव यंदा प्रचंड उत्साहात पार पडला. ‘नवसाला पावणारी आई’ आणि ‘माहेरवाशिणींची पाठीराखी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातेरी मातेच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

या पावन सोहळ्याचे औचित्य साधत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी देवस्थानात उपस्थित राहून देवीचे मनोभावे दर्शन घेतले व श्रीचरणी श्रीफळ अर्पण केले. त्यांनी विधिवत पूजा करत संपूर्ण जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

भेटीदरम्यान देवस्थान कमिटी व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने विशाल परब यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. जत्रोत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या भाविकांशी व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधत उत्सवाच्या नियोजनाबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. माजगावच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.

यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा हा जत्रोत्सव भाविकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा