*वेंगुर्ला तालुका समस्त वारकरी संप्रदाय कडून श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन*
*श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक म्हणजेच वारकरी संप्रदाय – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई*
वेंगुर्ला
दिनांक ०२/०१/२०२६ ते दिनांक ०४/०१/२०२६ पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या भव्य कीर्तन महोत्सवात स्वामी शिवानंद आश्रम शेकीन हासुर चे मठाधिपती ह.भ.प. वेदांतचार्य उदय पाटील (शास्त्री) , वासकर फड – पंढरपूर चे ह.भ.प.आनंद महाराज जाधव आणि श्री गुरु आजरेकर फड- पंढरपूरचे रायगड जिल्ह्यातील रायगड भूषण ह.भ.प.शिवम संदेश कदम यांची विणेकरी ह.भ.प.सावळाराम महाराज कुर्ले , मृदंगमणी श्री जगदीश महाराज पाटील व यश महाराज मांजरे तसेच गायनाचार्य ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर (जिल्हा वारकरी संप्रदाय – अध्यक्ष) , ह.भ.प.धनंजय महाराज ओलेकर , ह.भ.प.सोपानदेव महाराज तावडे , ह.भ.प.सूर्यकांत महाराज जोशी (सोन्सुरे) , ह.भ.प.संतोष महाराज रेगडे (निळेली) , ह.भ.प.प्रकाश डिचोलकर, ह.भ.प. त्रिमूर्ती महाराज सातार्डेकर (उभादांडा) ,यांचे साथीने सुस्राव्य कीर्तने सादर होणार आहेत .
किर्तन महोत्सवाचे उद्घाटन ह.भ.प. सावळाराम महाराज कुर्ले आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई , श्री सातेरी पंचायतन देवस्थानचे मानकरी श्री सुनील परब , नगरसेवक आणि वारकरी संप्रदायाचे श्री सदानंद गिरप , ज्येष्ठ वारकरी श्री जीजी साळगावकर , नगरसेवक श्री रविंद्र शिरसाट , वासकर फड पंढरपूर चे चोपदार कडव महाराज यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व पूजन करून करण्यात आले .
यावेळी वारकरी संप्रदायाचे वसंत तांडेल , प्रतीक खानोलकर , शाम रेवणकर , प्रसाद गुरव , सतीश कदम , राजा वेंगुर्लेकर , अनिल मांजरेकर , श्याम सुंदर कोळंबकर , पंकज शिरसाठ , श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान – दाभोस चे पुजारी श्याम खोबरेकर , पूर्वेश तोरस्कर , रामेश्वर देवस्थान चे पुजारी गौरेश परब , भाई गुरव , श्याम प्रसाद गुरव , विनायक गुरव उपस्थित होते .
प्रस्ताविक व आभार श्री वसंत तांडेल यांनी व्यक्त केले .
