४ जानेवारी रोजी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते कार्यक्रम; महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व खासदार नारायण राणे यांची उपस्थिती
सावंतवाडी :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ५:३० वाजता सावंतवाडी येथील कार्यालय परिसरात हा कार्यक्रम संपन्न होईल.
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार असून याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेवडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी समीर घारे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले आणि सहायक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.

