You are currently viewing मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन होणार

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन होणार

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन होणार

 सिंधुदुर्गनगरी 

कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग बेरोजगार उमेदवारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण  योजनेंतर्गत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांसाठी पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचे जिल्हा प्रशसनाच्या निदर्शनास आले आहे. दिनांक २९ डिसेंबर  रोजीच्या उद्योग मित्र समिती सभेमध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी आस्थापना यांनी आपल्याकडे असणाऱ्या रिक्त पदांबाबत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयास अवगत करावे. आपणकडून रिक्त पदे अधिसूचित केल्यानंतर लवकरच दिव्यांग रोजगार मेळाव्यांची तारीख निश्चित करुन आपणास मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येईल. जेणेकरुन सदरची रिक्त पदे दिव्यांग रोजगार मेळाव्यामध्ये प्रसिध्द करण्यात येतील व त्याचा फायदा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना होईल.

कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्य विभागाच्यावतीने राज्यातील युवकाना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व त्यांची नोकरी मिळण्यासाठी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाने २०२४ -२५ या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणर आहे. आस्थापनांमध्ये रूजू होणाऱ्या १२ वी पास प्रशिक्षणार्थीना ६ हजार आयटीआय व पदविका प्रशिक्षणार्थींना ८ हजार आणि पदविधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन ११ महिन्यार्पंत मिळणर आहे, या योजनेबाबतची सर्व कार्यवाही ही ऑनलाईन असल्याने मुख्यमंत्री युवा काय प्रशिक्षण योजनेच्या https://www.cmykpy.mabaswayam.gov.in या पोर्टलवर आस्थापनेने आपली नोंदणी करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी सर्व शासन निर्णयातील सूचनांचे पालन करुन सर्व प्रक्रिया ऑनलाईन करणे अनिवार्य आहे. रूजू करून घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची उपस्थिती Aadhar Enabled Biometric Attendance System (AEBAS) व्दारे नोदविण्यातबाबत दिनांक २८ मार्च २०२५ च्या शासन निर्णयात नमुद आहे. त्यानुसार संबंधित कार्यालय, आस्थापना यांनी ऑनलाईन प्रक्रिया करुणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी आस्थापना तसेच जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत व दिव्यांग रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा