*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवे वर्ष*
एक युग संपले
संपले एक वर्ष
हिरवळ लेऊन आले
आले नवे वर्ष
सुख समृद्धि संपन्नतेचा
फडकेल झेंडा घराघरात
बघा आले नवे वर्ष
नांदेल शांती घराघरात
पुन्हा उडतील सोनेरी चिमण्या
सोनेरी माझ्या देशात
धन धान्य भरलेले राहील
घरोघरी माझ्या देशात
वाईटाला नाही थारा
दिवस चांगले राहील
आपसात राहिल बंधूप्रेम
माणसं मानवतेने वागतील
आनंदाचा मेळा राहील
नवे नवे सर्व राहील इथे
गीत संगीतच्या आस्वादात
राहील सभ्यता प्रेमभाव इथे
जीवनात क्षणाक्षणाला
हास्यानंद घेऊन आले
नव आशेचा किरण घेऊन
बघा नववर्ष आले
नवा नवा झगमगाट
नवनवे उजळू लागले
पहाट घेऊनी आली
पहिले किरण
बघा नव वर्ष आले
मनोकामना पूर्ण व्हावी
हिच मनातून सदिच्छा
नवे वर्ष सुखात जावे
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*(चांदवडकर) धुळे.*
7588318543.
