सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड
नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते शाल–पुष्पगुच्छ देऊन सत्कार
वेंगुर्ले / प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मेस्त्री यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी (भाजपा) वेंगुर्ले तालुका कार्यालयात गौरवपूर्ण सत्कार सोहळा पार पडला. नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, जि.का.का. सदस्य व नगरसेवक सुहास गवंडळकर, जि.का.का. सदस्य मनवेल फर्नांडिस, महिला मोर्चाच्या सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, नगरसेवक सचिन शेटये, किरण कुबल, नगरसेविका रिया केरकर, गौरी माइणकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, हसीनाबेन मकानदार तसेच विश्वकर्मा समाजाचे संतोष मेस्त्री, आनंद मेस्त्री, महादेव मेस्त्री, अच्युत मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या विश्वासाबद्दल शरद मेस्त्री यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांचे आभार मानत, समाजहितासाठी कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
